![]() |
![]() |
| चेंज ऑफ गार्ड सेरेमनी |
![]() |
| राष्ट्रपती भवन |
राष्ट्रपती भवन भेटीची वेगळी नोंदणी करावी लागते. ज्यामध्ये अशोका हॉल, दरबार हॉल (भारतरत्न, पद्मभूषण, पद्मश्री शा उच्च स्तरिय सन्मान कार्यक्रम पार पडतो), मुघल गार्डन, जेवणाचा हॉल, कॉन्फरन्स हॉल पाहायला मिळतो. मात्र, अजून एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. महात्मा गांधींचं छायाचित्र किंवा पुतळा जेवणाच्या हॉलमध्ये, गॅलरीमध्ये, ज्या ठिकाणी इतर देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे राष्ट्रपती यांची अधिकृत भेट होते, तिथेही गांधी होते. हे सगळं पाहताना मोबाईल काऊंटरला जमा केल्यामुळे एकही फोटो काढता येत नाही. दरबार हॉलमधील गौतम बुद्धाची मूर्ती आणि इंडिया गेट यामध्ये ४ किमीच अंतर आहे आणि ‘कट टू कट’ समारोसमोर अशी रचना लूट्यन्सने केली असल्याची माहिती आम्हाला गाईडने दिली. (आपण आगोदरच नोंदणी केली असल्यामुळे गाईडची फीचा सुद्धा त्याच रकमेमध्ये समावेश असतो.) मुघल गार्डन पाहायची खूप इच्छा होती. परंतु, रिन्युएशनचं काम सुरू असल्यामुळे ते पाहण्याची संधी आमची हुकली. त्यासाठीही वेगळी नोंदणी आणि पैसे भरावे लागतात.
राष्ट्रपती भवन संग्रहालयाला भेट देण्यासाठीसुद्धा सेपरेट नोंदणी करावी लागते. त्याप्रमाणे आपल्याला राष्ट्रपती कार्यालयाकडून तारीख आणि वेळ कळवला जातो. बरोब्बर त्याचवेळेत संग्रहालयात गेलं तर ठीक आहे. नाहीतर किरकिर ऐकून घ्यावी लागेल व नंतर हुज्जत घालून हा प्रश्न मिटतो. आमच्यावर ही वेळ आली होती म्हणून हा उल्लेख करावा वाटला. इथेपन प्रणव मुखर्जी यांनी संपूर्ण वस्तू संग्रहालय डिजीटल स्वरूपात केल्यामुळे पाहताना अजिबात कंटाळा येत नाही. या संग्रहालयात एक मर्सिडीज गाडी आहे. जी १९९० साली दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भेट मिळाली होती. ती त्यांनी राष्ट्रपतींना भेट दिली. तेव्हापासून माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्यापर्यंतच्या राष्ट्रपतींनी ही गाडी वापरली आहे. एपीजे अब्दुल कलामांच्या दररोज वापरातील वस्तूही इथे पाहायला मिळतील. बंद केलेल्या ५०० रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधी आणि १० माणसाच्या चित्राची प्रतिकृती इकडे दिसते. तसेच आतापर्यंत होऊन गेलेल्या इतर राष्ट्रपतींचेही साहित्य इथे पाहायला मिळते.
![]() |
| संग्रहालयातील दृश्य |
'प्रणव मुखर्जी
पब्लिक लायब्ररी' मुघल गार्डनच्या
पाठीमागील भागात दिसते. याची सुरुवात प्रणवदा यांनीच केली आहे.
संसद भवन:
![]() |
| संसद भेट |
खरं पाहिलं संसद पाहण्याचा दिवस हा माझ्यासाठी ऐतिहासिक होता. देशाची सगळी धोरणं जिथून ठरतात. अशा संसद भवनमध्ये जाता आलं. प्रत्यक्षात कामकाज कसं चालत, कमेऱ्यात न टिपलेले दृश्य पाहता आले. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा माणूस अन् केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मांडणी ऐकायला भेटली. काँग्रेसच्या अधिर रंजन चौधरी, भाजपच्या राजीव प्रताप रुडी यांच्या व इतर खासदारांच्या प्रश्नांना गडकरी यांनी दिलेली समर्पक उत्तरे ऐकायला मिळाली. शिवसेनेचे अरविंद सावंत, नवनीत कौर राणा, श्रीनिवास पाटील, इम्तियाज जलील, सुप्रिया सुळे यांना गॅलरीतून पाहायला मिळालं. विशेष म्हणजे आम्ही बसलो त्या गॅलरीतून फक्त विरोधक खासदारच दिसत होते. सत्ताधारी खासदार फार कमी दिसत होते.
इथली सुरक्षाव्यवस्था पाहून एकवेळ आश्चर्य वाटलं! पण शेवटी शेवटी फार कंटाळा होता. तब्बल १५ वेळा १५ ठिकाणी चेकिंग करण्यात आलं. अक्षरशः संसदेत बसल्यानंतरही आमच्यासोबत सुरक्षा रक्षक होते. माग पुढं सरकायचं म्हटलं तरी, सुरक्षा रक्षक सौम्य शब्दात दम भरवत होता. 'आराम से बैठो' असं म्हणून तो आपली ड्युटी करत होता. याआगोदर रांगेत उभे असताना सुरुवातीला समोरासमोर असलेल्या दोन महान पुतळ्याचे दर्शन झाले होते. बाबू जगजीवन राम आणि यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे संसदेत शिरल्याबरोबर दिसतात. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्यांचे दर्शन घडते. त्यांचे पुळेही समोरासमोर उभे असल्याचे पाहायला मिळते. याच परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही पुतळा ऐटीत उभा आहे.
संसदेतील ४५ मिनिटांच्या कालावधीत नेमकं काय पाहावं
अन् काय नाही अशी अवस्था झाली होती. मनात हुरहूर कायम राहील ती म्हणजे फारच कमी
वेळ हा प्रत्यक्ष लोकसभा दालनात घालवायला भेटला. दमदार विजय मिळवलेले खासदार
श्रीनिवास पाटील हा माणूसच जेंटलमन! संसदेच्या पायरीवर मस्तपैकी बसून त्यांना
गराडा घातलेल्या लोकांबरोबर 'कांदा भाववाढ' या विषयी हा
माणूस बोलत होता. मधूनच इकडे तिकडे चाललेल्या लोकसभा सदस्यांबद्दल माहिती देत
चुटके सांगत तरूणांना ते हसवत होते. काही अडचण अलि तर संपर्क करा असं म्हणून त्यांनी आम्हाला
वैयक्तीक संपर्क करा असंही सांगितलं. डॉ. अमोल कोल्हे यांच्यामुळे खरं तर संसदेत प्रत्यक्ष जाऊन कामकाज
अनुभवता आलं त्यांना मनापासून धन्यवाद!
(व्यवस्थित नियोजन केलं तर राजधानीत बऱ्याच गोष्टी पाहता येतात हे नक्की)






No comments:
Post a Comment